कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मोदींवर टीका करण्याची संधी सोडताना दिसत नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे पेटवण्याच्या आवाहनावर त्यांनी यावेळी संयम राखत टीका न केल्याचे पाहायला मिळाले आहे. 'हे पूर्ण व्यक्तीगत प्रकरण असून मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रकरणात ना का खुपसाव, ज्याला दिवे लावायची ईच्छा आहे, त्यांनी लावावे', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
'मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रकरणात उगाच का नाक खुपसू' - Mamata on PM'
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मोदींवर टीका करण्याची संधी सोडताना दिसत नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे पेटवण्याच्या आवाहनावर त्यांनी यावेळी संयम राखत टीका न केल्याचे पाहायला मिळाले आहे.
'सध्या देशावर कोरोनाचे संकट आहे. यामध्ये योग्य व्यवस्थापन करावे की, राजकारण करावे, ज्यांना पंतप्रधान मोदी यांचे शब्द योग्य वाटले त्यांनी त्यांचे पालन करावे. जर मला झोपायचं असेल तर मी झोपी जाईन. ही पूर्णपणे वैयक्तिक बाब आहे',असे बॅनर्जी म्हणाल्या.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 5 एप्रिल म्हणजे रविवारी देशवासियांना रात्री 9 वाजता आपल्या घरातील लाईट बंद करून दिवे, टार्च, मोबाईल लाईट लावण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विरोधातील लढाई लढताना देशवासी एकजूट असल्याचा संदेश यातून देण्यात येणार आहे.