महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'जय श्रीराम'च्या घोषणा देणाऱ्यांना दीदींनी सुनावलं, भाषण करण्यास दिला नकार

ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी

By

Published : Jan 23, 2021, 5:44 PM IST

17:17 January 23

'जय श्रीराम'च्या घोषणा देणाऱ्यांना दीदींनी सुनावलं, भाषण करण्यास दिला नकार

कोलकाता -आज नेताजी सुभाषचंद्र बोस  यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारकडून कोलकात्यातील व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांना कार्यक्रमाला संबोधीत करण्यासाठी बोलावले. तेव्हा उपस्थितांमधील काही जणांनी 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या. ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला आणि घोषणा देणाऱ्या सुनावलं.  

मला असे वाटते की सरकारकडून आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमात  काही शिष्टाचार असावा. हा एक राजकीय क्रार्यक्रम नाही.  नेताजी यांच्या जयंती निमित्त कोलकातामध्ये कार्यक्रम आयोजीत केला. याबद्दल मी सरकारची  आभारी आहे. कुणाला आमंत्रित करुन त्यांना बेइज्जत करणं शोभा देत नाही. मी कोणत्याच राजकीय मुद्यावर प्रतिक्रिया देणार नाही, असे त्या म्हणाल्या.  

बॅनर्जी यांचा रोड शो -  

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी श्याम बाजार ते रेड रोड पर्यंत 9 किमी लांबीचा रोड शो आयोजित केला होता. या रोड शोमध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.  

मोदींचे संबोधन -  

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकाता दौऱ्यावर आहेत. स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कोलकात्यातील व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये आयोजीत कार्यक्रमाला मोदींनी संबोधीत केले. नेताजींसारख्या महापुरुषाला कोटीकोटी प्रणाम. नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या आधुनिक सैन्याचे निर्माते होते, असे मोदी आपल्या संबोधणात म्हणाले. कोलकता येथे नेताजींच्या असीम धैर्य आणि पराक्रमाच्या सन्मानार्थ आजचा दिवस 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा करण्यात आला.  

ABOUT THE AUTHOR

...view details