महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दीदी, मी 'जय श्रीराम' म्हणत आहे; मला अटक करून दाखवाच - अमित शाह - bjp

‘कोणी ‘जय श्री राम' म्हणत असेल, तर ममता दीदी नाराज होतात. मी आज इथे 'जय श्री राम' असा उद्घोष करत आहे. ममतादीदी, तुमच्यात हिंमत असेल तर, मला अटक करून दाखवाच. मी उद्या कोलकातामध्ये असेन,' असे शाह यांनी म्हटले आहे.

अमित शाह

By

Published : May 13, 2019, 7:22 PM IST

कोलकाता - 'मी 'जय श्रीराम' म्हणत आहे. मला अटक करून दाखवाच,' असे आव्हान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिले. ते जॉयनगर लोकसभा मतदार संघात झालेल्या रॅलीमध्ये बोलत होते. 'तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता माझ्या पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या सभांवर बंदी घालू शकतात. मात्र, त्या राज्यात भाजपचा विजयरथ रोखू शकत नाहीत,' असे शाह यांनी म्हटले.

‘कोणी ‘जय श्री राम' म्हणत असेल, तर ममता दीदी नाराज होतात. मी आज इथे 'जय श्री राम' असा उद्घोष करत आहे. ममतादीदी, तुमच्यात हिंमत असेल तर, मला अटक करून दाखवाच. मी उद्या कोलकातामध्ये असेन,' असे शाह यांनी म्हटले आहे. अमित शाह यांच्या सभेला जादवपूर या ठिकाणी परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर शाह यांनी जॉयनगर भागात सभा घेतली. तेव्हा त्यांनी ममतांवर निशाणा साधला.

लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि अखेरचा टप्पा बाकी आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. 'माझ्यासोबत हात उंचावा आणि विजय संकल्प करा' असे म्हणत त्यांनी 'जय श्रीराम' असा उद्घोष केला. त्यांच्यासह भाषणाला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनीही जय श्रीराम असा नारा दिला. गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शाब्दिक चकमक उडताना दिसते आहे. आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी जय श्रीराम म्हणणारच हिंमत असल्यास अटक करून दाखवा म्हणत ममता बॅनर्जींना आव्हान दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details