कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढील आठवड्यात सर्व तृणमूल काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावल्याची माहिती पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. राज्यात २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडी कायम राखण्यासाठी तसेच, निवडणूकपूर्व धोरण या बैठकीत ठरवण्यात येणार आहे.
२९ जुलैला पक्षाच्या सर्वेसर्वा ममता यांनी आगामी विधानसभा निवडणुकांचे डावपेच व पक्षाची भूमिका यांसदर्भात बैठक आयोजित केल्याचे या नेत्याने सांगितले. तसेच, बैठकीदरम्यान पक्षाचे राजकीय सल्लागार व रणनिती तज्ञ प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले.