कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संप तसेच धरणे आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना चार तासांच्या आत कामावर रूजू होण्याचे आदेश दिले आले. या आदेशाचे पालन न करणाऱयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा ममतांनी दिला आहे.
बंगालमध्ये गेल्या तीन दिवसांपासून डॉक्टरांचा संप सुरू आहे. त्यामुळे आरोग्य सेवेवर प्रचंड परिणाम झाला आहे. याची दखल घेत कोलकात्यातील एसएसकेएम रुग्णालयासमोर निदर्शने करणाऱ्या डॉक्टरांना तत्काळ परिसर रिकामा करण्याचे आदेश ममतांनी दिले. तसेच रुग्णालयात केवळ रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच प्रवेश देण्यात यावा, असे निर्देश त्यांनी सुरक्षा रक्षकांना दिले आहेत. या निदर्शनांमागे विरोधी पक्षांचा हात असल्याचा आरोप ममतांनी केला आहे. ज्युनिअर डॉक्टरांनी केलेला संप ही कम्युनिस्ट पक्ष आणि भाजपचे षडयंत्र असल्याचे त्या म्हणाल्या. बंगालचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते ममता बॅनर्जींकडे आहे.