महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोदींना लोकशाहीची 'थप्पड' माराविशी वाटते - ममता बॅनर्जी - tight

मोदी हे बंगालमध्ये आल्यानंतर माझ्या पक्षावर पैसे खाण्याचा (तोलबाज) आरोप केला. मला त्यांना लोकशाहीची थप्पड' मारायची आहे, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी मोदींवर हल्लाबोल केला.

ममता बॅनर्जी

By

Published : May 7, 2019, 8:45 PM IST

कोलकाता - पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची जीभ घसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकशाहीची एक थप्पड' मारावीशी वाटते, असे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले.

ममता बॅनर्जी

पैसे हे माझ्यासाठी कधीच महत्वाचे नाहीत. मोदी हे बंगालमध्ये आल्यानंतर माझ्या पक्षावर पैसे खाण्याचा (तोलबाज) आरोप केला. मला त्यांना लोकशाहीची चापट मारायची आहे, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी मोदींवर हल्लाबोल केला.

पुरुलिया येथे एका सभेमध्यो ममता बॅनर्जी बोलत होत्या. त्या म्हणाल्या मोदींनी अच्छे दिन आणण्याचे स्वप्न भारताला दाखवले. मात्र तसे न करता त्यांनी भारताला आर्थिक संकटात नेले. आता ते संविधानसुद्धा बदलणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details