महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ममता बॅनर्जींनी घेतली मोदींची भेट; पश्चिम बंगालच्या प्रश्नांवर चर्चा - Mamata meets Modi

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांसोबत झालेली भेट ही केवळ सौजन्य म्हणून असल्याचे ममता बॅनर्जींनी स्पष्ट केले. आपण पश्चिम बंगालशी संबंधीत प्रश्नांवर आणि समस्यांवर चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. या भेटीच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालमधील वातावरण चांगलेच तापले आहे.

Mamata Banerjee meets Narendra Modi

By

Published : Sep 18, 2019, 7:45 PM IST

नवी दिल्ली- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट चांगली झाल्याचे त्यांनी नंतर लगेचच पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

पश्चिम बंगालचे नाव बदलून 'बांग्ला' असे करण्याबाबत आम्ही चर्चा केली. याबद्दल विचार करण्याचे मोदी यांनी आश्वासन दिले आहे. यासोबतच, देओचा पचामी या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या कोळसा ब्लॉकच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची देखील विनंती मी मोदीजींना केली आहे. नवरात्री पूजेनंतर हा कार्यक्रम पार पडणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : अयोध्या प्रकरणाची सुनावणी १८ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी - सरन्यायाधीश

पंतप्रधानांसोबत झालेली भेट ही केवळ सौजन्य म्हणून असल्याचे ममता बॅनर्जींनी स्पष्ट केले. तसेच, आपण पश्चिम बंगालशी संबंधीत प्रश्नांवर आणि समस्यांवर चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये, केंद्राकडून मिळणारे पेन्शन फंड, तसेच राज्याचे नाव बदलणे अशा प्रश्नांचा समावेश होता हेही त्यांनी स्पष्ट केले.

नरेंद्र मोदींवर कठोर टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये ममता बॅनर्जी यांचाही समावेश होतो. त्यामुळे त्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालमधील वातावरण चांगलेच तापले आहे.

हेही वाचा : ई-सिगारेटवर बंदी, उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि तुरुंगवासाची तरतूद

ABOUT THE AUTHOR

...view details