कोलकाता -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘एनआरसी’ विरोधात कोलकातामध्ये आज मोर्चा काढला. यावेळी त्यांनी एनआरसी मुद्यावरून भाजपवर हल्लाबोल केला. एनआरसीच्या नावाखाली बंगालमध्ये एकाही व्यक्तीला धक्का जरी लावला, तर त्यांची खैर नाही, असे त्या म्हणाल्या.
हे ही वाचा -परदेशातही बाप्पाची धूम, बहरीन देशात गणेश विसर्जन उत्साहात
'आम्ही बंगालमध्ये एनआरसी लागू करण्यासाठी कधीच परवानगी देणार नाही. त्यांना (भाजपला) धार्मिक आणि जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडू देणार नाही. आसामध्ये पोलीस प्रशासनाचा वापर करून लोकांची तोंड बंद केली. मात्र, बंगाल हे शांतपणे सहन करणार नाही', असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांच्यासोबत तृणमूल काँग्रेसचे प्रमुख नेते, मंत्री आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. यापूर्वी 7 आणि 8 सप्टेंबर रोजी तृणमूलने जिल्ह्यात एनआरसीविरोधात मोर्चा काढत निषेध नोंदविला होता.
हे ही वाचा -वीज कोसळून आठ मुलांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी...
आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकत्त्व नोंदणीची अंतिम तारीख जाहीर झाली आहे. भारतीय नागरिकत्त्वाच्या यादीमध्ये ३ कोटी ११ लाख २१ हजार ४ लोकांचा समावेश करण्यात आला. तर १९ लाख ६ हजार ६५७ लोकांना यातून वगळण्यात आले आहे. ज्या लोकांचा या यादीमध्ये समावेश झाला नाही, त्यांना नागरिकत्त्व सिद्ध करण्याची संधी देण्यात येणार आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.