महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ममता बॅनर्जीचे मोदींना पत्र; निवडणुकांच्या काळातील खर्चावर व्यक्त केली चिंता - लोकसभा निवडणूक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींना पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकांच्या काळात केलेल्या खर्चावर चिंता व्यक्त केली आहे.

ममता बॅनर्जी

By

Published : Jul 25, 2019, 7:18 PM IST

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींना पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकांच्या काळात केलेल्या खर्चावर चिंता व्यक्त केली आहे.


'केंद्रीय माध्यम अभ्यासच्या अहवालानुसार 2019 ची लोकसभा निवडणूक आता पर्यंतची सर्वात जास्त खर्चिक निवडणूक ठरली आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2014 लोकसभा निवडणुकांपेक्षाही जास्त खर्च ह्या निवडणुकीमध्ये करण्यात आला आहे. 2019 च्या निवडणुकांमध्ये तब्बल 60 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत,' असे ममता यांनी पत्रात म्हटले आहे.


भारतात निवडणुकांच्यावेळी खर्च करण्यात आलेल्या सार्वजनिक निधीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वदलीय बैठक घ्यावी, असे ममता यांनी पत्रात म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी निवडणुकांच्या काळात मोठ्या प्रमाणात झालेल्या खर्चावर चिंता व्यक्त केली आहे. हे भ्रष्टाचाराचे मूळ आहे. त्यामुळे भ्रष्टाचार संपवण्यासाठी निवडणुकांच्या वेळी सार्वजनिक निधीतून होणाऱ्या खर्चावर नियंत्रण आणणे आणि सुधारणांवर चर्चा करणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.


अमेरिकामध्ये 2016 निवडणुकांच्यावेळी 6.5 बिलियन तर भारतात 8.65 बिलियन खर्च झाला आहे. यानुसार भारतातील निवडणूक ही जगातील सर्वात महागड्या निवडणुकांमध्ये सामील झाली आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details