नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी रामलीला मैदानावर रविवारी धन्यवाद रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीवर टीका केली. त्यावर 'कोण चुकीचे कोण बरोबर हे जनताच ठरवेल' असे म्हणत ममता यांनी मोदींवर पलटवार केला.
मी सर्व काही सार्वजनिक व्यासपीठावर बोलले. तुमचे म्हणणे देखील जनतेसमोर आहे. देशभरात एनआरसी लागू करण्याच्या गृहमंत्र्याच्या वक्तव्याचे पंतप्रधान सार्वजनिकपणे खंडन करत आहेत. भारताच्या मूलभूत विचारांची विभागणी कोण करत आहे, असा सवाल त्यांनी टि्वटमध्ये उपस्थित केला. कोण योग्य आहे आणि कोण चूक, हे लोक निश्चितपणे ठरवतील, असेही त्या म्हणाल्या. पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाना साधला होता. ममता बॅनर्जी कोलकात्यावरून थेट संयुक्त राष्ट्रामध्ये पोहचल्या आहेत. काही वर्षांपूर्वी त्या बांग्लादेशातून येणाऱ्या घुसखोरांना थांबवण्यात यावे, तेथून येणाऱ्या शणार्थींना मदत करावी, अशी मागणी करत होत्या. मात्र, आता त्या का बदलल्या असा सवाल मोदींनी केला होता.