नवी दिल्ली -चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे भारत दौऱ्यावर असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूमधली महाबलीपूरम येथे होते. त्यावेळी महाबलीपूरम येथील किनाऱ्यावर बसून मोदींनी एक कविता लिहिली. त्यांनी ही कविता टि्वटवर शेअर केली आहे.
'काल महाबलीपूरम येथील किनाऱ्यावर सकाळी फिरताना समुद्राशी संवाद साधला. हा संवाद माझे भावनिक विश्व आहे. या संवादाचे शब्द मी तुमच्याशी शेअर करत आहे, असे मोदींनी टि्वटमध्ये म्हटले.
मोदींनी लिहलेली कविता अशी...
हे... सागर!!!
तुम्हें मेरा प्रणाम!
तू धीर है, गंभीर है,
जग को जीवन देता, नीला है नीर तेरा।
ये अथाह विस्तार, ये विशालता,
तेरा ये रूप निराला।
हे... सागर!!!
तुम्हें मेरा प्रणाम!
याचबरोबर मोदींनी महाबलीपूरमच्या समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबवले. त्यांनी स्वच्छते संदर्भात एक व्हिडिओ टि्वट केला. 'सकाळी महाबलीपूरममधील एका किनाऱ्यावर ३० मिनिट स्वच्छता अभियान राबवले. उचलेल्या कचऱ्याला हॉटेल स्टाफमधील जयराज यांच्याकडे सोपवले. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, ही आपली जबाबदारी आहे, असे मोदींनी टि्वटमध्ये म्हटले. त्यांनी निरोगी आणि स्वस्थ राहण्याचा संदेश दिला.
महाबलीपूरम येथे जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना महाबलीपूरम येथील मंदिरांचे दर्शन घडवले. त्यानंतर पंचरथ येथे दोन्ही नेत्यांनी नारळपाण्याचा मनसोक्त आनंद घेतला. मोदींनी दोन खास भेटवस्तू जिनपिंग यांना दिल्या आहेत.