नवी दिल्ली -मद्यसम्राट विजय मल्ल्या एसबीआय, आयडीबीआय आणि इतरांकडून घेतलेली 9,000 कोटी रुपयांची कर्जाची परतफेड करण्याची वारंवार ऑफर देत आहे. मात्र, ही ऑफर कोणतीही बँक स्वीकारू शकत नाही, असे एका बँकेच्या उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले.
माजी राज्यसभेचा सदस्य आणि कर्जामध्ये बुडालेल्या किंगफिशर एअरलाईन्सचा मालक विजय मल्ल्या बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवल्यामुळे आणि मनीलॉड्रींगचा गुन्हा दाखल झाल्याने 2016 मध्ये इंग्लडला पळून गेला होता. त्यानंतर तो सतत कर्जाचे पैसै परत करण्याची ऑफर बँकाना करतो आणि बँकांकडून ती स्वीकारली जात नसल्याची तक्रार तो टि्वटच्या माध्यमातून करत असतो.
विजय मल्ल्या आपल्याकडे कर्जाची परतफेड करण्या ईतका पैसा असल्याचा दावा करत आहे. मात्र, पैसै काही एखाद्या कोठरीत ठेवलेले नाहीत. जेथून काढून तो बँकाना परत देईल आणि क्लीन चिट मिळवेल. मल्ल्याने इतर कोणत्याही व्यावसायिकाप्रमाणे आपला पैसे स्टॉक्स, शेअर्स, बँक खाती आणि मालमत्ता आदी व्यवसायांमध्ये गुंतवलेला आहे, असे एसबीआय यूकेचे माजी सीईओ प्रभाकर काझा म्हणाले.
मल्ल्याला जेव्हा-जेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियाने पैसै परत देण्यास सांगतिले. तेव्हा तो प्रत्येक वेळी एक यादी देतो. त्या दराने जर सर्व गोष्टी कमी केल्या तर परतफेड करेल, अशी अट ठेवतो. एकूणच, सरकारला कर्जाची परतफेड करण्याची वारंवार ऑफर देणं हा फक्त त्याचा प्रचार स्टंट आहे, असे प्रभाकर काजा म्हणाले.