नवी दिल्ली- भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल फ्रान्समध्ये शस्त्रपूजा केली. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा 'राफेल'ची देखील पूजा करण्यात आली. त्यावर, हे सर्व करताना 'एवढा तमाशा करण्याची गरज नव्हती' अशी टीका काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.
'राफेल घेताना एवढा तमाशा करण्याची गरज नव्हती..' - मल्लिकार्जुन खर्गे
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विजयादशमी निमित्त राफेलचे शस्त्रपूजन केल्याने संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावर टीका केली आहे.
Shastra Puja