महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 17, 2019, 12:06 PM IST

ETV Bharat / bharat

भारताने झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाची मागणी केलेली नाही, मलेशियाचे पंतप्रधान

रशियातील भेटीमध्ये झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाविषयी मोदी काहीही बोलले नाहीत असे महातीर मोहम्मद म्हणाले.

झाकीर नाईक

मलेशिया- विवादित मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईक यांच्याबाबत मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी वक्तव्य केले आहे. झाकीर नाईक मलेशियाचे नागरिक नाहीत. आधीच्या सरकारने त्यांना कायम रहिवासी म्हणून परवानगी दिली आहे. मात्र, कायम रहिवासी दर्जा दिलेली व्यक्ती देशातील राजकीय व्यवस्थेवर बोलू शकत नाही, असे महातीर म्हणाले. तसेच भारताने झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाची मागणी केलेली नाही, असे महातीर म्हणाले.

नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ते मलेशियामध्ये बोलू शकत नाहीत, असे महातीर यांनी सांगितले. झाकीर नाईक यांचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याबाबात विचारले असता, नुकत्याच झालेल्या भेटीमध्ये मोदी प्रत्यार्पणाविषयी काहीही बोलले नाही, तशी मागणी मोदींनी केली नाही, असे महातीर म्हणाले. भारतासाठीसुद्धा झाकीर नाईक अडचण ठरु शकतात, असे महातीर म्हणाले.

रशियामध्ये नुकत्याच झालेल्या 'इस्टर्न इकॉनॉमिक फोरम'च्या बैठकीवेळी पंतप्रधान मोदी आणि महातीर यांची भेट झाली होती. त्यावेळी झाकीर नाईक यांच्या प्रत्यार्पणाविषयी मोदींनी महातीर यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आले होते. झाकीर नाईक यांच्या भडकाऊ भाषणांमुळे बांग्लादेशातील काही लोकांनी दहशतवादी कृत्य करण्यास प्रोत्साहन मिळाले, असे तपासामध्ये पुढे आले होते. तसेच अनेक भाषणांमध्ये झाकीर नाईक यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे पोलीसांना नाईक तपासासाठी हवे आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details