लंडन -हाड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध कोरोनाग्रस्त रुग्णांवर कितपत उपयुक्त ठरते यावर इंग्लडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांचा अभ्यास सुरु आहे. अनेक कोरोनाग्रस्तांना हे औषध देण्यात आले होते. मात्र, हाड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे कोरोना बरा होण्यास मदत करत नसल्यामुळे रुग्णांना औषध देणे थांबविण्यात आले आहे, असे संशोधकांनी सांगितले.
1 हजार 542 रुग्णांवर केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले की, हाड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधामुळे मृत्यूदर कमी होण्यात आणि इतर लक्षणे कमी होण्यात काहीही फरक दिसून आला नाही. 28 दिवसांनंतर ज्यांना एचसीक्यू गोळ्या दिल्या त्यातील 25.7 टक्के रुग्ण दगावले तर एचसीक्यू शिवाय उपचार सुरु असेलल्या रुग्णांपैकी 23.5 टक्केच रुग्ण दगावले. दोन्ही अभ्यासातील फरक हा नगन्य असल्याचे मत संशोधकांनी नोंदविले.