रायपूर - टी-शर्ट हा प्रकार सर्वच वयोगटातील लोक आवडीने वापरतात. घालण्यासाठी आणि धुण्यासाठी सोपा म्हणून टी-शर्टकडे पाहिले जाते. आपण घालत असलेला टी-शर्ट हा प्लास्टिकपासून बनवलेला असेल तर..? प्लास्टिकपासून टी-शर्टही बनू शकतो ही गोष्ट कठीण आहे मात्र, अशक्य नक्कीच नाही. रायपूर मधील एका तरुणाने सिंगल युज प्लास्टिकपासून टी-शर्ट तयार करण्याची युक्ती शोधून काढली आहे. अधीश ठाकूर असे या तरुणाचे नाव आहे.
अधीश ठाकूरने सिंगल युज प्लास्टिकचा वापर करून स्वत:चा स्टार्ट-अप सुरू केला आहे. वापरलेल्या 8 ते 10 प्लास्टिक बाटल्यांपासून अधीश एक टी-शर्ट तयार करतो. विशेष म्हणजे तयार केलेल्या प्रत्येक टी-शर्टच्या बाहीवर लिहिलेले असते, की हा टी-शर्ट प्लास्टिकपासून तयार केलेला आहे. तरीही अनिश यांच्या या उपक्रमाला लोकांची पसंती मिळत आहे. या माध्यमातून प्लास्टिक समस्येवर मात करता येऊ शकते.