ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लिबियामध्ये सात भारतीयांचे अपहरण; कुटुंबीयांच्या संपर्कात पराराष्ट्र मंत्रालय - भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव

लिबियामध्ये सात भारतीयांचे अपहरण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या सातही जणांचे लिबियातील अशवरीफ या ठिकाणावरून 14 सप्टेंबरला अपहरण झाले आहे. भारतीय पराष्ट्र मंत्रालय त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचे अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.

भारतीय परराष्ट्र मंत्रालय
भारतीय परराष्ट्र मंत्रालय
author img

By

Published : Oct 9, 2020, 2:11 PM IST

नवी दिल्ली -लिबियामध्ये सात भारतीयांचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. हे नागरिक आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील निवासी आहेत. याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली आहे. या सर्वांचे लिबियातील अशवरीफ या ठिकाणावरून 14 सप्टेंबरला अपहरण झाले आहे. भारतीय पराष्ट्र मंत्रालय त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचे अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.

भारतात परतण्यासाठी ते त्रिपोली विमानतळावर जात होते. यावेळी वाटेतच त्याचे अपहरण झाल्याची माहिती आहे. हे सात जण बांधकाम आणि तेलपुरवठा करणाऱ्या कंपनीमध्ये काम करत होते. त्यांच्या परतीसाठी भारत सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती अनुराग श्रीवास्तव यांनी दिली. तथापि, त्यांचे अपहरण कोणी केले, याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाही.

लिबियामध्ये सध्या गृहयुद्ध सुरू आहे. त्यामुळे लिबिया प्रवासासंबधित परिपत्रक 2015मध्ये भारत सरकारने जारी केले होते. तेथील प्रवास टाळावा, असे पत्रकात म्हटले होते. त्यानंतर 2016मध्ये सरकारने लिबिया प्रवासावर प्रतिबंध लावला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details