डेहराडून - 'मला तुझा खूप अभिमान वाटतो, आय लव्ह यू; जय हिंद!' हे उद्गार आहेत, पुलवामा येथील दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत वीरमरण आलेल्या जवानाच्या 'वीर'पत्नीचे... शवपेटीत चिरनिद्रा घेत पहुडलेल्या आपल्या पतीला अत्यंत प्रेमाने डोकावून पाहात तिने त्याचे अंत्यदर्शन डोळ्यात साठवून घेतले. या वीराशी विवाह होऊन अवघे एक वर्षही न झालेल्या तरुण वीरपत्नीच्या धैर्याला सर्व स्तरांतून सलाम केला जात आहे.
'मला तुझा खूप अभिमान वाटतो, आय लव्ह यू'; निरोप देताना वीरपत्नीचे गौरवोद्गार - respect
भारतीय लष्करातील अधिकारी मेजर विभूती शंकर धौंडियाल यांची वीरपत्नी निकिता हिने त्यांच्या पार्थिवाला अंतिम निरोप देताना 'माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझे तुझ्यावर प्रेम राहील. मी स्वतःला तुला समर्पित करत आहे. तू आज सोडून चालला आहेस, हे अत्यंत यातनादायी आहे. पण तू माझ्यासोबत माझ्या अवतीभवती नेहमी आहेस, याची मला खात्री आहे,' असे हृदय पिळवटून टाकणारे उद्गार काढले.
भारतीय लष्करातील अधिकारी मेजर विभूती शंकर धौंडियाल यांची वीरपत्नी निकिता हिने त्यांच्या पार्थिवाला अंतिम निरोप देताना 'माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझे तुझ्यावर प्रेम राहील. मी स्वतःला तुला समर्पित करत आहे. तू आज सोडून चालला आहेस, हे अत्यंत यातनादायी आहे. पण तू माझ्यासोबत माझ्या अवतीभवती नेहमी आहेस, याची मला खात्री आहे,' असे हृदय पिळवटून टाकणारे उद्गार काढले. शवपेटीत डोकावत आपल्या आयुष्यभराचा सोबती अचानकपणे सोडून जात असताना त्याला दिलेला 'फ्लाईंग किस' प्रत्येकाच्या हृदयावर निश्चितच कोरला जाईल.
या वीरपत्नी निकिताचा संदेशही तितकाच मोठा आहे. 'माझ्यासाठी आणि माझ्या पतीसाठी, सर्व वीरांसाठी आणि त्यांच्या वीरपत्नींसाठी सहानुभूती व्यक्त करू नका, अशी विनंती मी सर्वांना करते. त्याऐवजी प्रत्येकाने खंबीर बनावे. कारण आपल्याला सोडून जाणारा हा माणूस आपल्या प्रत्येकापेक्षा मोठा आहे. आपण सर्वजण त्याला सलाम करूया.'
'तू खरोखरच खूप शूर होतास. तुझी वीरपत्नी म्हणवून घेताना मला खूप मोठा सन्मान मिळाला आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझे तुझ्यावर प्रेम राहील. मी माझे आयुष्य तुला समर्पित करत आहे. मला तुझा खूप अभिमान वाटतो. आमचे सर्वांचे तुझ्यावर प्रेम आहे. मात्र, तुझे आम्हा सर्वांवर प्रेम करण्याची पद्धत खूपच वेगळी आहे. ज्या लोकांसाठी तू आत्मबलिदान केलेस, त्या लोकांना तू कधी भेटलाही नसशील. तरीही तू तुझे जीवन त्यांच्यासाठी अर्पण करत हौतात्म्य पत्करलेस.' वीरपत्नी निकिताने तिच्या पतीच्या पार्थिवाला उद्देशून बोललेल्या या शब्दांनी उपस्थितांना अश्रू अनावर झाले.