महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तू खोटं बोलायचास, माझ्यावर प्रेम करतोय..तू तर देशावर प्रेम करत होतास - वीरपत्नी निकिता - चकमक

पुलवामा हल्ल्यात मेजर विभूती धौंडीयाल हे शहीद झाले. त्यामुळे त्यांच्या पत्नी निकिता यांनी पती विभूती यांच्याबाबत हृदय हेलावून टाकणारे उद्गार काढले.

वीरपत्नी निकिता

By

Published : Feb 20, 2019, 8:22 AM IST

देहरादून - काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेले मेजर विभूती धौंडियाल मंगळवारी पंचतत्वात विलीन झाले. त्यांच्या जाण्यामुळे त्यांची पत्नी निकिताने हातपाय गाळले नाहीत, तर तिने पतीचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले. तिच्या शब्दांनी उपस्थितांची हृदये हेलावून गेली.

निकिताच्या शब्दांनी केले निःशब्द -

"तुम झूठ बोलते थे कि तुम मुझसे प्यार करते थे

तुम तो देश से प्यार करते थे
ये बात देख कर मुझे जलन होती है
तुम जिनको जानते भी नहीं थे...तुमने उनके लिए जान दी
तुमने मुझे फोकस रहना सिखाया
विभूति मैं तुमसे अंतिम सांस तक प्यार करूंगी
मैं लोगों से कहूंगी कि लोग सहानभूति ना जताएं
मैं सब से कहूंगी कि चलो जाते-जाते इनको सब सैल्यूट करते हैं"
असे म्हणत निकिताने पतीला अत्यंत जोशपूर्ण 'जय हिंद' म्हणत सलाम केला.


पुलवामामध्ये सीआरपीएफच्या बसच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली होती. या कारवाईत मेजर विभूती त्यांच्या पथकाचे नेतृत्व करत होते. या चकमकीत पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड गाजी उर्फ कामरान याला मेजर विभूतींच्या पथकाने ठार केले. मात्र, या कारवाईत मेजर विभूतींना वीरमरण आले.

आईला सांगितली नव्हती बातमी

विभूती यांच्या कुटुंबीयांनी मेजर विभूती यांना वीरमरण आल्याची बातमी त्यांच्या आईला सांगितली नव्हती. त्यांची आई हृदय विकाराची रुग्ण असल्याने, ही बातमी त्यांच्यापासून लपवण्यात आली होती. त्यांना ही बातमी १० तास उशिरा सांगण्यात आली. सोमवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव डेहराडूनला आणण्यात आल्यानंतर सर्वत्र शोककळा पसरली. शेजाऱ्यांनी आणि उपस्थितांनी या कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला.

संपूर्ण कुटुंबासाठी सोमवारची रात्र अत्यंत भयावह आणि यातनादायी ठरली. मुलाचे शरीर शवपेटीत होते. तो कोणाशी बालू शकत नव्हता. रडून-रडून आईची अवस्था वाईट झाली होती. २४ तासांपूर्वी फोनवर बोललेला पती आता आपल्याला कायमचा सोडून गेला, हे कसे घडले, हे त्याच्या पत्नीच्या लक्षात येत नव्हते. मेजर विभूती आता या जगात नसले, तरी त्यांच्या शौर्याचे गुणगान नेहमीच होत राहील.

ABOUT THE AUTHOR

...view details