श्रीनगर -जम्मू कश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा हल्ल्याचा कट उधळून लावला. पुलवामाजवळ एका कारमध्ये इंप्रोवाईज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) ठेवण्यात आले होते. सुरक्षा दलाने वेळीच आयईडी निकामी केल्याने मोठा अनर्थ टळला.
पुलवामामध्ये टळला मोठा दहशतवादी हल्ला; कारमधून स्फोटके जप्त - पुलवामा आयईडी जप्त
जम्मू कश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलाने दहशतवाद्यांच्या घातपाताचा कट उधळून लावला. पुलवामाजवळ एका कारमध्ये इंप्रोवाईज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) ठेवण्यात आले होते. कठुआमध्ये रजिस्टर्ड असलेल्या या गाडीचा कश्मीर पोलिसांनी माग काढला होता. गाडी चालवणारा दहशतवाही फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.
कार
कठुआमध्ये रजिस्टर्ड असलेल्या या गाडीचा कश्मीर पोलिसांनी माग काढला होता. गाडी चालवणारा दहशतवाही फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. केंद्रीय तपास पथकाकाडे याचा तपास देण्यात आला आहे. तसेच परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
गतवर्षी 14 फेब्रुवारीला आयईडीचा वापर करुन असाच हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले होते.
Last Updated : May 28, 2020, 12:09 PM IST