महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या माध्यम विभागात मोठा बदल; नितीन वाकणकर नवे प्रवक्ते - केंद्रीय गृहमंत्रालय प्रवक्ते

वाकणकर हे महासंचालक स्तरावरील अधिकारी आहेत. प्रेस इन्फरनेशन ब्युरो विभागात ब्युरो ऑफ आऊटरिच अॅन्ड कम्युनिकेशन येथे महासंचालक म्हणून कार्यरत नितीन वाकणकर यांची बदली गृह मंत्रालयात करण्यात आली आहे.

नितीन वाकणकर
नितीन वाकणकर

By

Published : Jun 5, 2020, 9:18 PM IST

नवी दिल्ली - गृहमंत्रालयाच्या जनसंपर्क आणि माध्यम विभागात मोठा बदल करण्यात आला असून आधी काम करणाऱ्या संपूर्ण पथकाची बदली करून दुसऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय माहिती सेवा विभागातील वरिष्ठ अधिकारी नितीन डी. वाकणकर यांची नियुक्ती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रमुख प्रवक्तेपदी करण्यात आली आहे.

आधीच्या प्रवक्त्या वसुधा गुप्ता यांच्या जागी वाकणकर यांची बदली करण्यात आली आहे. गुप्ता यांची बदली डायरेक्टर जनरल ऑफ फॅक्ट चेक या प्रेस इन्फरमेशन ब्युरो(PIB) विभागात करण्यात आली आहे.

वाकणकर हे महासंचालक स्तरावरील अधिकारी आहेत. प्रेस इन्फरनेशन ब्युरो विभागात ब्युरो ऑफ आऊटरिच अॅन्ड कम्युनिकेशन येथे ते महासंचालक म्हणून कार्यभार पाहत होते. तेथून त्यांची बदली गृह मंत्रालयात करण्यात आली आहे. त्यांच्या बदली मागील कारण अस्पष्ट आहे.

वाकणकर यांनी संरक्षण मंत्रालयात प्रवक्ते म्हणूनही काम पाहिले आहे. दुसरे वरिष्ठ माहिती अधिकारी राज कुमार यांची केंद्रीय गृह मंत्रालयात अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रविण कावी यांची उप संचालक पदी नियु्क्ती करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details