हैदराबाद - आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमध्ये गुरुवारी पहाटे फार्मा कंपनीत विषारी वायू गळती झाली. या घटनेमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकांना रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया देशभरात आत्तापर्यंत झालेल्या वायू गळतींच्या घटनांबाबत
⦁ ०२-१२-१९८४ - मध्य प्रदेशच्या भोपाळमधील युनियन कार्बाईड प्लांटमध्ये झालेल्या विषारी वायू गळतीत ३ हजार ७८७ लोकांचा मृत्यू तर, १६ हजाराहुन अधिक मृत्यू झाला असल्याचे दावे करण्यात आले.
⦁ १२-११-२००६ - गुजरातच्या भरूच जिल्ह्याच्या अंकलेश्वर शहरातील तेल कारखाण्यात झालेल्या वायू गळतीमध्ये ३ जणांचा मृत्यू
⦁ १६-०७-२०१० - पश्चिम बंगालच्या दुर्गापूर स्टील प्लांटमधील विषारी कार्बन मोनोऑक्साइड वायू गळतीने 25 लोक गंभीर आजारी पडले.
⦁ ०२-०८-२०११ - कर्नाटकच्या जिंदल स्टील प्लांटमध्ये ब्लास्ट फर्नेसमधून झालेल्या विषारी वायू गळतीमुळे ३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
⦁ २३-०३-२०१३ - तामिळनाडूच्या तुतीकोरिन येथील प्लांटमधून सल्फर डायऑक्साईड या विषारी वायुच्या गळतीमुळे शेकडो लोकांना घशात खोकला, जळजळ आणि श्वास गुदमरण्यासारख्या समस्या उद्भवल्या. या घटनेत एका जणाचा मृत्यू.
⦁ ०५-०६-२०१४ - तामिळनाडूच्या तुतीकोरिन येथील निला फिश प्रोसेसिंग युनिटमध्ये अमोनिया गॅसची पाईपलाईन फुटून झालेल्या गळतीमुळे ५४ महिला बेशुद्ध झाल्या होत्या.
⦁ ०७-०८-२०१४ - केरळच्या कोल्लम येथील सरकारी मालकीच्या प्लांटमधून पसरलेल्या विषारी धुरामुळे ७० मुले आजारी पडली होती.
⦁ २७-०८-२०१४ - पश्चिम बंगालच्या बर्दवानमधील वेल्डिंग कार्यशाळेमध्ये सीलेंडरमधून झालेल्या वायू गळतीमुळे 2 महिलांचा मृत्यू झाला तर, 50 जण गंभीर.
⦁ १३-०७-२०१४ - छत्तीसगडच्या भिलाई स्टील प्लांटमध्ये झालेल्या वायू गळतीमुळे ५० जण गंभीर आजारी पडले. या घटनेत प्लांटमधील डेप्युटी मॅनेजर बीके सिंघल आणि एमके कटारिया यांच्यासह ५ वरिष्ट अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.