गांधीनगर :गुजरातच्या अहमदाबादमधील वाटवा जीआयडीसी परिसरात असलेल्या दोन केमिकल कंपन्यांमध्ये आज पहाटे मोठे स्फोट झाले. यानंतर कंपन्यांच्या इमारतींना भीषण आग लागली, ज्याची माहिती मिळताच अग्नीशामक दलाचे ४० बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या सुमारे १०० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी अथक परिश्रमाने ही आग आटोक्यात आणली. सध्या याठिकाणी कूलिंगचे काम सुरू आहे.
मीथोमील स्फोट..
मीथोमील नावाच्या केमिकलचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन कंपन्यांमध्ये सुमारे आठ स्फोट झाले होते. हे स्फोट एवढे मोठे होते, की सुमारे पाच किलोमीटर पर्यंतच्या परिसरात यांचा आवाज ऐकू गेला. विझोल आणि वाटवा परिसरातील लोक या आवाजाने जागे झाले, आणि आगीची माहिती मिळताच सर्वांनी कंपनीच्या इमारतीकडे धाव घेतली.
बाजूच्या पाच कंपन्यांना आग..