लखनऊ -स्वातंत्र्यलढ्याच्या चर्चेत लखनऊचे नाव आले नाही, असे होऊच शकत नाही. इंग्रजांशी झालेल्या संघर्षात लखनऊमध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. लखनऊच्या अमीनाबाद येथील अमीरुद्दौला झंडेवाला पार्क येथे पहिल्यांदा राष्ट्रीय तिरंगा फडकवण्यात आला होता. याच शहरात जवाहर लाल नेहरू आणि महात्मा गांधीजींची भेट झाली. यानंतर या जोडीने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात केलेल्या कामगिरीने इतिहास घडवला.
लखनऊच्या जनाना पार्कशी जुळल्या आहेत गांधीजींच्या अनेक आठवणी जनाना पार्कविषयी थोडेसे...
1928 मध्ये याच पार्कमध्ये तिरंगा फडकवण्यात आला. मोतीलाल नेहरू आणि थोर स्वातंत्र्य सेनानी गोविंद वल्लभ पंत या सभेला उपस्थित होते. 1935 मध्ये याच पार्कमध्ये गांधीजी काँग्रेसची शताब्दी साजरी करण्यासाठी आले होते. या पार्कच्या पाठीमागे गंगा प्रसाद वर्मा स्मारक भवन आहे. गांधीजींकडून प्रेरणा घेऊन गंगा प्रसाद वर्मा यांनी तीन बीघा जमीन त्या काळी 15 हजार रुपयांना खरेदी केली होती.
हेही वाचा - गोरखपूरचे चौरी-चौरा हत्याकांड, गांधीजींनी मागे घेतले असहकार आंदोलन
गांधीजी लखनऊला अनेकदा आले. ते येथे 1920 मध्ये आले असताना त्यांनी महिलांना संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी महिलांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. तेव्हा या पार्कला मोठे महत्त्व आले होते. नंतरही स्वातंत्र्यावेळी येथे अनेक बैठका झाल्या.
गांधीजी जेव्हा येत असत, तेव्हा ते फिरंगी महलला नेहमी भेट देत असत. गांधीजींनी येथील मौलानांना एकत्रित आणून खिलाफत चळवळ उभी केली. हळूहळू मौलाना या चळवळीत सहभागी होऊ लागले. पुढे मौलान आझाद आणि गांधीजींदरम्यान घनिष्ठ संबंध निर्माण झाले. जेव्हा गांधीजींची हत्या झाली आणि मौलान आझाद यांना ती बाब माहिती झाली, तेव्हा ते अनवाणी पायांनीच चालत निघाले.
हेही वाचा - 'या' शहराच्या कणाकणात आहेत गांधीजी; हरिजन गुरूद्वारामध्ये आजही जाणवतं बापूंचं अस्तित्व
फिरंगी महल येथील स्वातंत्र्य लढ्यातील अनेक आठवणी सांगितल्या जातात. त्यामध्ये 'येथे आंदोलन किंवा सभा सुरू करताना प्रथम 'वंदे मातरम्' म्हटले जाई आणि त्यानंतर 'अल्लाहू अकबर' म्हटले जाई' ही आठवण आवर्जून सांगितली जाते.