महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वसतिगृहात एकटीच असल्याने अभ्यासात मन लागत नाही, राजस्थानमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनीची महाराष्ट्र सरकारला विनंती - लॉकडाऊन इफेक्ट

आता कोटा येथे जवळपास २० हजार विद्यार्थी अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, हरीयाणा, दिल्ली, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर आणि हिमचाल प्रदेशाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कोरोना महामारीमुळे चिंता वाढली आहे. तसेच घरापासून दूर असल्याने अभ्यासात मन लागत नाही. सतत घरची आठवण येत असते. त्यामुळे डिप्रेशन आल्यासारखे वाटते. तसेच कुटुंबीयांची चिंता वाटत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

kota news  lockdown in kota  students trapped in kota  coaching students in kota  maharashtrian student stuck in kota Rajasthan  कोटा राजस्थानमध्ये अडकले महाराष्ट्रीयन विद्यार्थी  लॉकडाऊन इफेक्ट  lockdown effect
वसतिगृहात एकटीच असल्याने अभ्यासात मन लागत नाही, राजस्थानमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनीची महाराष्ट्र सरकारला विनंती

By

Published : Apr 23, 2020, 7:57 PM IST

कोटा -राजस्थानमधील कोटा येथे परराज्यातील जवळपास २० हजार विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईची विद्यार्थिनी ऋतुजा कनोजिया ही विद्यार्थिनी देखील अडकली आहे. वसतिगृहामधील सर्व विद्यार्थी घरी गेल्याने ती एकटी पडली आहे. तसेच सतत कुटुंबीयांची चिंता लागलेली असते. त्यामुळे अभ्यासात देखील मन लागत नाही. माझ्यासारखे कितीतरी विद्यार्थी अडकले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आम्हाला इथून घरी नेण्याची सोय करावी, अशी विनंती तिने केली आहे.

वसतिगृहात एकटीच असल्याने अभ्यासात मन लागत नाही, राजस्थानमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनीची महाराष्ट्र सरकारला विनंती

कोटामधून आतापर्यंत जवळपास १६ हजारापेक्षा जास्त विद्यार्थी आपआपल्या राज्यात गेले आहेत. यामध्ये उत्तरप्रदेश सरकारने आपल्या विद्यार्थ्यांसाठी बसेस पाठवल्या होत्या. त्यापाठोपाठ मध्यप्रदेश आणि गुजरात आणि दमन व दीव या केंद्रशासित प्रदेशाने देखील आपल्या विद्यार्थ्यांसाठी घरी परतण्याची सोय केली होती. सर्व विद्यार्थ्यांनी स्वगृही परतल्याने राज्य सरकारचे आभार मानले. तसेच आपल्या आई-वडिलांजवळ राहून अभ्यासात देखील मन लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

आता कोटा येथे जवळपास २० हजार विद्यार्थी अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडीशा, हरीयाणा, दिल्ली, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर आणि हिमचाल प्रदेशाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कोरोना महामारीमुळे चिंता वाढली आहे. तसेच घरापासून दूर असल्याने अभ्यासात मन लागत नाही. सतत घरची आठवण येत असते. त्यामुळे डिप्रेशन आल्यासारखे वाटते. तसेच कुटुंबीयांची चिंता वाटत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details