नवी दिल्ली -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी समीत ठक्कर या तरुणाला अटक केली आहे. यावर उत्तर प्रदेशमधील पिलीभीतचे भाजपा खासदार वरुण गांधी यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली. महाराष्ट्र सरकारने समीत ठक्कर या तरुणावर केलेली कारवाई, ही बेकायदेशीर असून लोकाशाहीसाठी घातक आहे, अशी टीका त्यांनी केली.
हे पूर्णपणे अमानुष, बेकायदेशीर आणि अनैतिक आहे. लोकशाहीमध्ये संवाद बळकट करण्यासाठी राजकीय विरोध होऊ शकतो. प्रत्येकाल अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे. एखाद्या व्यक्तीला प्राण्यासारखी वागणूक देणे, हे राष्ट्राला कमजोर करते. अशा कारवायामुळे लोकशाहीला धोका असून ही निरंकुशपणा आणि फॅसिझमची पुनरावृत्ती आहे, असे वरुण गांधी म्हणाले.