महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महाराष्ट्र सरकार स्थलांतरीत मजुरांच्या अडचणींचे राजकारण करतयं - पियुष गोयल - केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल

महाराष्ट्र राज्य सरकार स्थलांतरीत मजुरांच्या अडचणींचे राजकारण करत असल्याचा आरोप केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केला आहे. त्यांनी सलग टि्वट प्रसिद्ध करत महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्र
महाराष्ट्र

By

Published : May 27, 2020, 9:45 AM IST

नवी दिल्ली - लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी केंद्र सरकारकडून ट्रेन सोडण्यात आहे. मात्र त्यावरुन आता राजकारण सुरू झाले आहे. 'महाराष्ट्र सरकारने स्थलांतरीत मजुरांच्या अडचणींचे राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केला आहे. तसेच गरीब कामगारांना त्यांच्या घरी नेण्यासाठी मदत करा, अशी मी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला विनंती करतो, असे ट्वीटही गोयल यांनी केले आहे.

महाराष्ट्रामधून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 145 रेल्वेपैकी 85 रेल्वे धावणार होत्या. मात्र, राज्य सरकारने योग्य कार्यवाही न केल्यामुळे फक्त 27 रेल्वेच धावल्या आहेत. त्यांनी मागितल्या तितक्या गाड्या आम्ही त्यांना दिल्या, परंतु गाड्या प्रवाशाविना तेथून परत आल्या आहेत. महाराष्ट्र सरकार स्थलांतरीत मजुरांच्या अडचणींचे राजकारण करत आहे. मात्र, रेल्वे विभाग मजुरांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी दिवस-रात्र कार्य करत आहे, असे टि्वट गोयल यांनी केले आहे.

145 श्रमिक रेल्वे गाड्यां सोडण्याचे नियोजण आखण्यात आले होते. मात्र, प्रवाशी नसल्याने त्यापैकी फक्त 10 ट्क्केच गाड्या धावल्या आहेत, असे गोयल यांनी म्हटंल. नियोजन व सातत्याने प्रयत्नानंतर रेल्वेने अगदी कमी सूचनेवर आपली संसाधने एकत्रित केली आणि 26 मेपासून महाराष्ट्रातून गाड्या सोडण्यासाठी तयार केल्या, असे गोयल म्हणाले.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पियुष गोयल यांच्यावर महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचा गोयल यांचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details