महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राज्यपाल कोश्यारींची उलचबांगडी होण्याची शक्यता, कलराज मिश्र होणार महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोश्यारी यांच्या जागा राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

कलराज मिश्र, भगत सिंह कोश्यारी
संग्रहित छायाचित्र

By

Published : Nov 27, 2019, 1:34 PM IST

नवी दिल्ली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या नाट्यात भाजपच्या प्रतिमेला नुकसान पोहचले, त्याची नुकसान भरपाई म्हणून भाजप राज्यपाल बदलीचे पाऊल उचलणार असल्याचे बोलले जात आहे.

कोश्यारी यांची जागा राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. कलराज मिश्र यांनी ९ सप्टेंबर रोजी राजस्थानच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्याआधी यावर्षी २२ जुलैला त्यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, तेथून त्यांची राजस्थानात बदली करण्यात आली होती. आता ते महाराष्ट्राचे राज्यपाल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा -मी पवारांना भेटलो ही मीडियाची बातमी, विरोधात होतो आताही विरोधात बसणार - शिवेंद्रराजे भोसले


कलराज मिश्र हे उत्तर प्रदेशातील वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी उत्तरप्रदेश राज्यात तसेच केंद्रात मंत्री म्हणून काम पाहिले आहे. उत्तर प्रदेशात त्यांनी भाजप पक्षप्रमुखाचे काम पाहिले आहे. तसेच ते भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षही होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर काँग्रेस आणि महाविकास आघाडी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला होता. सत्याचा विजय झाला हा खरा प्रश्न नाही, तर राज्यपालांनी कशा पद्धतीने पक्षपाती निर्णय घेतले, हे सर्वोच्च न्यायालयाने पाहायला हवे, असे काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी म्हणाले. राज्यपालांनी संविधान, नियम, आणि संकेतांची पर्वा केली नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा -अघोरी प्रयत्न करून सुद्धा भाजपला मुख्यमंत्री लादता आला नाही - संजय राऊत

शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस या महाविकास आघाडीने राज्यापाल कोश्यारी यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि वकिल कपील सिब्बल यांनी राज्यपालांवर पक्षपातीपणाचा आरोप केला होता. तसेच राज्यपालांची कृती कायद्याच्या विरोधी असल्याचे ते म्हणाले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यपाल कोश्यारी यांना तत्काळ बदलण्यात यावे, असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले. कोश्यारी यांनी २३ नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांना सरकार बनवण्याचे आमंत्रण दिले. त्यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. सकाळी सकाळी झालेल्या या शपथविधीनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला होता. त्याविरोधात विरोधी पक्षांनी न्यायालयात धाव घेतली होती.

हेही वाचा -अजित पवारांच्या पाठिंब्याबद्दल वेळ आल्यावर बोलेन - देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details