हैदराबाद -महाराष्ट्रातील एका सीआरपीएफ जवानाने तेलंगणामध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कामावर असताना आपल्या सर्विस बंदुकीने स्वतःला गोळी मारून त्यांनी आत्महत्या केली. रविवारी पहाटे हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बबन विठ्ठलराव मानवर असे या जवानाचे नाव आहे. ते महाराष्ट्रातील नागपूरचे रहिवासी होते. तेलंगणामधील एका पब्लिक स्कूलमध्ये त्यांना तैनात करण्यात आले होते. कामावर असताना रविवारी पहाटे, आपल्या 'एसएलआर'ने (सेल्फ लोडिंग रायफल) स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्या केली.