महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये जरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी जागा कमी पडल्या असल्या तरी एनसीपी प्रमुख शरद पवार (७८) आणि काँग्रेसचे जुने अनुभवी सैनिक भूपिंदर हुडा (७२) हेच आपापल्या राज्यांत या क्षणांचे नायक आहेत.
महाराष्ट्रात पवारोत्तर युग सुरू करण्याचा भाजपचा डाव उद्ध्वस्त करताना, एनसीपीने ५६ जागा जिंकल्या आहेत आणि आपल्या जागांची संख्या गेल्यावेळपेक्षा १५ने वाढवली आहे. आपल्या पक्षाच्या प्रभावशाली कामगिरीनंतर पवार भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या वक्तव्याच्या रोखाने लगेच म्हणाले की, "लोकांना सत्तेचा माज आवडत नाही." शाह यांनी निवडणुकीपूर्वी असे म्हटले होते की, "जर आम्ही पक्षाचे दरवाजे उघडले तर शरद पवार सोडून सर्व एनसीपी नेते भाजपमध्ये येतील." निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजप सेनेत गेलेल्या एनसीपी नेत्यांना टोमणा मारताना पवार म्हणाले : "लोकांना दलबदलू लोकही आवडत नाहीत." पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एनसीपीचे अनेक पक्षांतर केलेले नेते एनसीपीच्याच उमेदवारांकडून पराभूत झाले, हे उल्लेखनीय आहे. पवार यांनी एकहाती महाराष्ट्रात विरोधी पक्षाच्या प्रचार मोहिमेचे नेतृत्व केले. कारण, काँग्रेस अंतर्गत भांडणे आणि मजबूत राज्यस्तरीय नेतृत्वाचा अभाव यातच गुंतली होती, याचा उल्लेख करायला हवा.
मुसळधार पाऊस असतानाही माजी मुख्यमंत्री पवार यांनी सातारा येथील सभेत आपले भाषण थांबवले नाही, त्यांचा पांढरा शर्ट पावसाच्या पाण्याने चिंब भिजला होता. हा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये सर्वत्र व्हायरल झाला; संपूर्ण निवडणूक प्रचार मोहिमेची ती निर्णायक प्रतिमा ठरली. आपले वाढते वय आणि पक्ष कार्यकर्त्यांचे वाढत चाललेले पक्षांतर याकडे दुर्लक्ष करून, पवार यांनी भर पावसा-चिखलात हिंडून अनेक सभा घेतल्या. परिणामस्वरूप, तेच सत्ताधारी भाजपचे एकमेव लक्ष्य ठरले. मुरब्बी राजकारणी असलेल्या पवारांनी आपल्यावरील वैयक्तिक हल्ल्यांचे रुपांतर स्वतःच्या फायद्यासाठी केले. ते म्हणाले, "महाराष्ट्र ही शिवाजी महाराजांची भूमी आहे. दिल्लीपुढे ती कधीही झुकणार नाही." लोकांना कमरेखालचे हल्ले आवडत नाहीत, हे माहीत असल्याने पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्तरीतील पवार यांची नक्कल केली तेव्हा त्यांनी प्रतिसाद देण्याचे काम राज्यातील लोकांवर सोपवले.
महाराष्ट्र-हरियाणा विधानसभा : जुन्या नेत्यांनी पुन्हा सिद्ध केली आपली ताकद
महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये जरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी जागा कमी पडल्या असल्या तरी एनसीपी प्रमुख शरद पवार (७८) आणि काँग्रेसचे जुने अनुभवी सैनिक भूपिंदर हुडा (७२) हेच आपापल्या राज्यांत या क्षणांचे नायक आहेत.
राष्ट्रीय सुरक्षा आणि कलम ३७० रद्द करून जातीय ध्रुवीकरण या मुद्यावर मते मिळवण्याचे भाजपच्या प्रयत्नांचा पवार यांनी पुरेपूर फायदा घेतला. हे मुद्दे राज्य निवडणुकीत फारच कमी महत्वाचे आहेत जेव्हा की, लोकांना बेरोजगारी आणि शेतीचे प्रश्न हे जास्त महत्वाचे आहेत. त्यांचे प्रयत्न वाया गेले नाहीत. त्यांचा एनसीपी राज्यात प्रथमच आघाडीतील वरिष्ठ भागीदार म्हणून समोर आला आणि काँग्रेसचे स्थान चौथ्या क्रमांकावर घसरले. पवार यांनी नंतर आपल्या पक्षाच्या चमकदार प्रदर्शनानंतर पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात त्यांच्याविरोधात जी जी काही वक्तव्ये केली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. सातारा येथील त्याच्या पक्षाचे माजी खासदार उदयनराजे भोसले (शिवाजी महाराज यांचे थेट वंशज) यांच्यावरही पवार यांनी जोरदार टीका केली, जे लोकसभा पोटनिवडणुकीत एनसीपी उमेदवाराकडून पराभूत झाले.
हरियाणात, काँग्रेसचे जुने अनुभवी योद्धे आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुडा हेच स्वाभाविकपणे या क्षणाचे नायक आहेत. राहुल गांधी यांच्याशी गंभीर मतभेद असलेले हुडा हे सोनिया गांधी पुन्हा अध्यक्ष होईपर्यंत नाराज होते. सोनिया गांधी यांनी त्यांना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तसेच निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख केल्यावर हुडा यांनी दुसरा डाव सुरू केला. हे त्यांच्यासाठी अर्धे युद्ध जिंकल्यासारखे होते जेव्हा त्यांनी राहुल गांधी यांनी नेमलेले राज्य काँग्रेस अध्यक्ष अशोक तंवर यांना हटवण्यात आले. राज्य काँग्रेस अध्यक्ष म्हणून नुकतीच नेमणूक झालेल्या कुमारी शैलजा यांच्याशी त्यांनी पूर्वी असलेले मतभेद दूर सारले आणि हुडा राज्यातील आपल्या जुन्या संबंधांवर विसंबून होते.
सदाबहार मित्र असलेले हुडा यांनी आपल्या जुन्या अनेक वर्षांपासूनच्या अनुयायांशी, मग ते कुणीही असोत, सातत्याने संपर्क ठेवला होता. खासगी चर्चेत हुडा नेहमी म्हणतात, "कोण केव्हा कामाला येईल हे सांगता येत नाही." हुडा यांच्या पुनरुत्थानामध्ये हरियाणात कॉंग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र, राहुल गांधी यांच्या निष्ठावंत लोकांसाठी हा अपशकून आहे. भाजपला जोरदार लढत देण्याचे नेतृत्व करणाऱ्या हुडा यांच्यामुळे मध्यप्रदेश आणि राजस्थान यासारख्या इतर राज्यांमध्ये जुन्या अनुभवी नेत्यांना आता राहुल यांचे आवडते समजले जाणारे ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांची पायमल्ली करण्याचे निश्चित धाडस होणार आहे.