महाराष्ट्र

maharashtra

महाआघाडीत सर्वच पंतप्रधानपदाचे दावेदार; त्यांना राहुल गांधींची उमेदवारी मान्य नाही - नरेंद्र मोदी

By

Published : Apr 13, 2019, 3:42 PM IST

'द्रमुकने पंतप्राधान पदासाठीचा उमेदवार म्हणून राहुल गांधींनी पाठिंबा दिला आहे. मात्र, महाआघाडीतील इतर पक्षांचा याला विरोध आहे. कारण, या आघाडीतील सर्वच जण पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहत आहेत,' अशा शब्दांत मोदींनी राहुल गांधी आणि महाआघाडीवर हल्लाबोल केला.

नरेंद्र मोदी

चेन्नई - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या प्रचारादरम्यान तामिळनाडूत आहेत. डीएमकेचे अध्यक्ष स्टॅलिन यांनी पंतप्रधानपदासाठी राहुल गांधीच्या नावाला पाठिंबा दिला. मात्र, महाआघाडीत सर्वच जण पंतप्रधान पदाचे दावेदार बनले आहेत. त्यामुळे द्रमुकच्या भूमिकेला त्यांना विरोध आहे. ते राहुल गांधींची पंतप्रधान पदासाठीची उमेदवारी मान्य करत नाहीत.


येथील एका सभेत त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देण्यावरुन द्रमुकवर निशाणा साधला. द्रमुकने पंतप्राधान पदासाठीचा उमेदवार म्हणून राहुल गांधींनी पाठिंबा दिला आहे. मात्र, महाआघाडीतील इतर पक्षांचा याला विरोध आहे. कारण, या आघाडीतील सर्वच जण पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहत आहेत, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि महाआघाडीवर हल्लाबोल केला.


आपल्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जालियानवाला बाग हत्याकांडच्या शताब्दीवर्षानिमित्त श्रद्धांजली वाहिली. तामिळनाडूतील दिग्गज आणि दिवंगत नेते एमजीआर आणि जयललिता यांनाही त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

ABOUT THE AUTHOR

...view details