महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहार महासंग्राम : महागठबंधनचे जागावाटप निश्चित; यादी आज जाहीर होण्याची शक्यता - बिहार विधानसभा निवडणूक जागावाटप

पहिल्या टप्प्यासाठी उमेदवाराचे नामांकन 1 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. बिहारमधील काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, जागावाटपाला सहमती दर्शविली गेली आहे. आज पाटण्यात ते जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

bihar assembly elections
बिहार महासंग्राम

By

Published : Oct 3, 2020, 4:07 PM IST

पाटणा (बिहार) -विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'महापठबंधन' झालेल्या पक्षांचे जागावाटप निश्चित झाले आहे. हे जागावाटप आज (शनिवारी) जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष त्यांची पहिली यादी जाहीर करू शकतात, अशी माहिती सुत्रांनी दिली.

पहिल्या टप्प्यासाठी उमेदवाराचे नामांकन 1 ऑक्टोबरपासून सुरू झाले असून शेवटच्या टप्प्याती नामांकने ८ ऑक्टोबरपर्यंत जाहीर केली जातील. बिहारमधील काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, जागावाटपाला सहमती दर्शविली गेली आहे. आज पाटण्यात ते जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर, "महागठबंधन"मधील ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, राष्ट्रीय जनता दल सुमारे १५५ जागा लढवू शकेल आणि विकासशील इंसान पक्षालाही सामावून घेण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेस पक्ष 70 जागा लढवणार आहे आणि सीपीआय, सीपीआय (एम) आणि सीपीआय (एमएल) हे डावेपक्ष जवळपास 30 जागा लढवणार आहेत.

बिहारमधील वाल्मीकी नगर लोकसभा पोटनिवडणुकीत कोण भाग घेणार याबाबत चर्चा सुरू आहे. कारण, या जागेवर राजद आणि कॉंग्रेस दोघांनाही निवडणूक लढवायची आहे.

बिहारमध्ये 71 जागांसाठी उमेदवारीचा पहिला टप्पायापूर्वीच सुरू झाला आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकांऱ्यांसमवेत मतदान संबंधित सर्व बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यातील निवडणूक अधिकारी तयारीच्या कामात व्यग्र आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details