फैजाबाद (उत्तर प्रदेश) - आयोध्येत पुन्हा नव्याने राम मंदिर बांधण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षांत राम मंदिराचे बांधकाम पूर्ण केले जाईल. भव्य मंदिर बनवण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी पुरेसा असल्याचे मत महंत कमलनयन दास यांनी व्यक्त केले. महंत दास हे राम जन्मभूमी न्यासाचे सदस्य आहेत. काही दिवसांपूर्वी काही गटांनी राम मंदिराच्या नियोजित आराखड्यात बदल करून ते आणखी भव्य करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर महंत दास यांनी आपले मत व्यक्त केले.
दोन वर्षांतच भव्य राम मंदिराचे काम पूर्ण होईल: महंत कमलनयन दास - आयोध्या राम मंदिर बांधकाम
भव्य मंदिर बनवण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी पुरेसा असल्याचे मत महंत कमलनयन दास यांनी व्यक्त केले. महंत दास हे राम जन्मभूमी न्यासाचे सदस्य आहेत. काही गटांनी काही दिवसांपूर्वी राम मंदिराच्या नियोजित आराखड्यात बदल करून ते आणखी भव्य करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर महंत दास यांनी आपले मत व्यक्त केले.
येत्या दोन वर्षांतच शक्य तितक्या भव्य राम मंदिराची निर्मिती केली जाईल. २०२२च्या रामनवमीपर्यंत मंदिर उभे करण्याचा न्यासाचा प्रयत्न आहे. सर्वांच्या सूचना ऐकून बदल करत गेलो तर, पुढील २० वर्षांतही मंदिर उभे राहणार नाही, असे महंत दास म्हणाले. मंदिराचे बांधकाम शक्य तितक्या वेगात व्हावे, यासाठी मंदिर न्यासची समिती लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे, असेही दास यांनी सांगितले.
दिगंबर आखाड्याचे प्रमुख महंत सुरेश दास यांच्या नेतृत्त्वाखाली साधूंच्या एका गटाने भाजपा आमदार वेदप्रकाश गुप्ता यांची भेट घेतली. मंदिराच्या सध्याच्या आराखड्यात बदल करण्याचे निवेदन त्यांनी गुप्ता यांना दिले. या पार्श्वभूमीवर महंत दास यांनी आपले मत मांडले. २ एप्रिलला राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होणार होती मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे काम सुरू करता आले नाही.