रीवा - मध्य प्रदेशातील जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांच्या सिव्हिल लाईन कॉलनीतील बंगल्यातून काही काही गुंडांनी चंदनाची चार झाडे तोडून नेली. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस विभागाला हादरा बसला आहे. बंगल्यातील सुरक्षारक्षकांना बंदुकीचा धाक दाखवून ही झाडे तोडून चंदनाची लाकडे पळवली.
बंदुकीचा धाक दाखवत चक्क न्यायाधीशांच्या बंगल्यातून तोडून नेली चंदनाची झाडे - sandalwood stealth
जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अरुण कुमार सिंह यांच्या बंगल्यात घसून ही चोरी करण्यात आली. येथील सुरक्षा रक्षक बुद्धीलाल कोल याने या गुंडांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्याला बंदुकीचा धाक दाखवून बदमाशांनी ही चोरी केली.
जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अरुण कुमार सिंह यांच्या बंगल्यात घसून ही चोरी करण्यात आली. येथील सुरक्षा रक्षक बुद्धीलाल कोल याने या गुंडांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्याला बंदुकीचा धाक दाखवून बदमाशांनी ही चोरी केली. न्यायाधीश सिंह यांच्या बंगल्यातील वेगवेगळ्या चार ठिकाणी असलेली चंदनाची झाडे तोडण्यात आली आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. येथील जागेची पाहणी करण्यात आली असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत. या घटनेमागे मोठ्या टोळीचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलीस बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरांचा शोध घेत आहे.