महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्य प्रदेशमध्ये दोन स्थलांतरित गर्भवती महिलांची प्रवासावेळी प्रसुती; ट्रक अन् रेल्वेमध्ये दिला बाळाला जन्म

महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमधील आपल्या घरी निघालेल्या 2 महिलांनी बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. एका महिलेची श्रमीक रेल्वमध्ये तर दुसऱ्या महिलेने ट्रकमध्ये प्रसुती झाली आहे.

BABY
BABY

By

Published : May 16, 2020, 12:33 PM IST

नवी दिल्ली - सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना विषाणूने आता भारतातही आपले जाळे झपाट्याने विस्तारले आहे. लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद पडल्याने अनेक मजूर, कामगार मिळेल त्या साधनाद्वारे किंवा पायपीट करत आपल्या घराकडे परतत आहेत. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमधील आपल्या घरी निघालेल्या 2 महिलांनी बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. एका महिलेची श्रमीक रेल्वमध्ये तर दुसऱ्या महिलेची ट्रकमध्ये बाळाला जन्म दिला.

गर्भवती असलेल्या कौशल्या मनोज कुमार या आपल्या कुटुंबासह मुंबई येथून मध्यप्रदेशला जात होत्या. प्रवासामध्ये त्यांना प्रसवकळा सुरू झाल्या. शुक्रवारी मध्य प्रदेशातील बियोरा शहराजवळ ट्रकमध्ये त्यांनी बाळाला जन्म दिला. प्रसुतीनंतर ट्रक चालकाने बाळ आणि आईला रुग्णालात दाखल केले असून डॉक्टरांनी महिलेला तपासणीसाठी राजगड येथे पाठवले आहे.

दरम्यान श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या आणखी एका गर्भवती प्रवासी महिलेने बाळाला जन्म दिला. डब्यात असलेल्या इतर महिलांच्या मदतीने महिलेची प्रसुती करण्यात आली. रेखा असे महिलेचे नाव ते असून गाजिपूरमधील रहिवासी आहेत. औरंगाबादहून पती ब्रजेश जयस्वाल यांच्यासह मजुरांच्या विशेष ट्रेनने त्या घरी परतत होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details