ग्वाल्हेर -मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्याचे दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी काँग्रेसला अल्टिमेटम देणारे जोतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांनी सोमवारी ग्वाल्हेरमध्ये पोस्टरबाजी करत, जोतिरादित्य यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळावेच, अशी मागणी केली आहे.
ग्वाल्हेरमध्ये ज्योतिरादित्य यांच्या समर्थकांनी त्यांना मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पद मिळावे यासाठी शहरात बॅनर लावले आहेत. ज्यामध्ये सोनिया गांधी यांनी कोणताही दबाव न घेता अध्यक्ष पदाचा निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांना करण्यात आले आहे.
हेही वाचा... खासदार अर्जून सिंह यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपकडून बराकपूरमध्ये १२ तासांचा बंद
मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये सध्या नवीन प्रदेश काँग्रेस कमिटी (पीसीसी) अध्यक्ष पदाबाबत पोस्टर वॉर सुरू झाले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांनी शहरात पोस्टर्सच्या माध्यमातून आपली मागणी उघडपणे मांडली आहे. शहरातील विविध ठिकाणी सोनिया गांधी यांच्या होर्डिंग्जमध्ये गांधी यांना उद्देशून काही संदेश जारी केले आहेत. ज्यात होर्डिंगवर ज्योतिरादित्य सिंधिया यांना कोणत्याही दबावाशिवाय प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा... हरियाणात हिट अॅन्ड रन : दोन पादचाऱ्यांना भरधाव कारने चिरडले
अशा परिस्थितीत पीसीसी अध्यक्षांविषयी निर्णय घेणे काँग्रेस हाय कमांडसाठी आणखीन आव्हानात्मक झाले आहे.
हेही वाचा... 'एनआरसीच्या अंतिम यादीमध्ये नाव नसलेल्यांना घाबरण्याचे कारण नाही.. तात्काळ ताब्यात घेणार नाही'