उज्जैन - विज्ञानाच्या क्षेत्रात अनेक नवी क्षितिजे पादांक्रात करणाऱ्या भारतात आजही अशा अनेक प्रथा-परंपरा कायम आहेत, की ज्या श्रद्धा की अंधश्रद्धा असा प्रश्न पडतो. अशा परंपरांमध्ये एक अनोखी परंपरा आहे, 'गाय गौरी'. या परंपरेनुसार दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अनेक लोक नवस बोलून गायींच्या पायाखाली झोपले जातात व त्यांच्या शरीरावरून गायींचा कळप धावत पुढे जातो.
भल्या सकाळी लोक लागतात तयारीला -
उज्जैन जिल्ह्यातील भीडावद गावाची लोखसंख्या जवळपास चार हजार आहे. तेथे ही परंपरा वर्षानुवर्षे पाळली जाते दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी भीडावद गावातील लोक सूर्योदयापूर्वी उटून गौरी पूजनाच्या तयारीला लागतात. सूर्य उगवताच मंदिरांमध्ये घंट्यांचा मधूर आवाज यायला सुरुवात होते. लोक आपल्या गायींना तयार करतात. येथे गायीला मातेचे रुप मानले जाते. शेकडो गायींना स्वच्छ धुवून आकर्षक रंगाने व मेंदीने सजवले जाते.
लोकांच्या शरीरावरून शेकडो गायी धावतात -