भोपाळ -देशभरामध्ये जेईई-नीट परीक्षाविरोधात काँग्रेसकडून आंदोलन सुरू असून परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. यातच मध्य प्रदेश सरकारने जेईई-नीटच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी माहिती दिली.
'जेईई-नीट' देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्य प्रदेश सरकारकडून मोफत प्रवासाची सुविधा - जेईई-नीट परिक्षा
मध्य प्रदेश सरकारने जेईई-नीटच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी मोफत वाहतूक सुविधा उपल्बध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी माहिती दिली.
जेईई-नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना संकटात वेळेवर परीक्षाकेंद्रावर उपस्थित राहता यावे, यासाठी परीक्षा काळात राज्य सरकार विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहतूक सुविधा उपल्बध करून देणार आहे. जिल्हा मुख्यालय आणि ब्लॉक मुख्यालय ठिकाणी वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यात येईल. मोफत वाहतूक सुविधा मिळवण्यासाठी विद्यार्थी 180 या क्रमांकावर संपर्क साधू शकता किंवा या लिंकवर जाऊन 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करू शकता, असे टि्वट शिवराज सिंह यांनी केले आहे. mapit.gov.in/covid-19
दरम्यान, जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर 2020 दरम्यान होणार असून, नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. जेईईसाठी सुमारे 8.58 लाख विद्यार्थ्यांनी, तर नीटसाठी सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनासारखी महामारी पुढील काळातही सुरू राहील. मात्र यासाठी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालता येणार नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. तर दररोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असताना परीक्षा केंद्रात जाऊन परीक्षा देण्यास लाखो विद्यार्थ्यांना सक्ती करणे म्हणजे या विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा अघोरी प्रकार असल्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे.