भोपाळ- जयपूरमधील काँग्रेस नेते भोपाळमध्ये दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून भोपाळ विमानतळावर कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच, कलम १४४ देखील लागू करण्यात आले आहे. सोमवारी होणाऱ्या 'फ्लोअर टेस्ट'साठी हे आमदार राज्यात परतत आहेत.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते हरीष रावत हे जयपूरमधील काँग्रेस नेत्यांसमवेत आहेत. आम्ही उद्या होणाऱ्या बहुमत चाचणी (फ्लोअर टेस्ट) साठी तयार आहोत. आम्हाला नाही, तर भाजपला उद्याची चिंता वाटत आहे. तसेच, काँग्रेसचे बंडखोर आमदारही आमच्या संपर्कात असल्याचे रावत यांनी सांगितले.