महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्यप्रदेश : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोरोना पॉझिटिव्ह

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांचे स्वॅब टेस्टींग करण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे.

shivraj singh chouhan news
मध्यप्रदेश : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोरोना पॉझिटिव्ह

By

Published : Jul 25, 2020, 12:23 PM IST

Updated : Jul 25, 2020, 3:12 PM IST

भोपाळ - मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांचे स्वॅब टेस्टींग करण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून मुख्यमंत्री शिवराज चौहान यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे.

चौहान यांच्या अनुपस्थितीत मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा त्यांचा कार्यभार सांभाळणार आहेत. चौहान यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना टेस्ट करण्याचे तसेच क्वारंन्टाइन होण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री चौहान यांनी स्वत: क्वारंन्टाइन होणार असल्याचे सांगितले असून कोरोनासंदर्भात होणाऱ्या सर्व बैठकांना ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावणार आहेत.

Last Updated : Jul 25, 2020, 3:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details