इंदूरमध्ये भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर - 6 dead 5 critically injured in accident in indore
दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. मृतांमध्ये एका लहान मुलीचा आणि एका लष्करी अधिकाऱ्याचा समावेश आहे. जखमींना एमवाय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
इंदूरमध्ये भीषण अपघात
इंदूर - मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तेजाजी नगर पोलीस ठाणे क्षेत्रात हा अपघात झाला. या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन चारचाकींची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. मृतांमध्ये एका लहान मुलीचा आणि एका लष्करी अधिकाऱ्याचा समावेश आहे. जखमींना 'एमवाय' रुग्णालयात हलवण्यात आले आहे.