नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर योगासनाचे थ्री-डी अॅनिमेटेड व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. या व्हिडिओमध्ये मोदीची प्रतिकृती वापरून योगासनाविषयी माहिती दिली आहे. हे व्हिडिओ तब्बल 24 भाषांमध्ये उपल्बध आहे.
मोदींनी शेअर केले योगासनाचे थ्री-डी अॅनिमेटेड व्हिडिओ - Maan ki Baat
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर योगासनाचे थ्री-डी अॅनिमेटेड व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. या व्हिडिओंमध्ये पंतप्रधान मोदींची व्यंगचित्र प्रतिमा वापरली गेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला संबोधीत केले. यादरम्यान, एका व्यक्तीने त्यांना तंदुरुस्तीबाबत विचारले. त्याला उत्तर देताना पीएम मोदी म्हणाले की, ते आपला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतील आणि स्वत: ला कसे तंदुरुस्त ठेवतात हे सांगतील. त्याप्रमाणे आज व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वटवर एक यूट्यूब लिंक शेअर केली आहे. यामध्ये वेगवेगळ्या योगासनाशी संबंधित व्हिडिओ आहेत. प्रत्येक व्हिडिओ सुमारे 2 ते 4 मिनिटांचा आहे. या व्हिडिओंमध्ये पंतप्रधान मोदींची व्यंगचित्र प्रतिमा वापरली गेली आहे.