महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मन की बात : हिंसा केल्यामुळे कोणत्याच समस्येवर तोडगा निघत नाही -

पंतप्रधान मोदींनी नववर्षातील प्रजासत्ताक दिनी सायंकाळी 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला.

मन की बात
मन की बात

By

Published : Jan 26, 2020, 8:13 PM IST

नवी दिल्ली -पंतप्रधान मोदींनी नववर्षातील प्रजासत्ताक दिनी सायंकाळी 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जल पुर्नभरणाच्या संकल्पनेवर त्यांनी भाष्य केले. तसेच नोटाबंदी ते स्वच्छता अभियान या मुद्द्यांचा उल्लेख मोदी यांनीकेला.

गेल्या २५ वर्षापासून संघर्ष करत असलेल्या ३४ हजार ब्रू समाजातील शरणार्थींना त्रिपुरामध्ये घरं दिली असल्याचे मोदींनी सांगितले. २१वे शतक हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि लोकशाहीचे युग असून येथे हिंसेला स्थान नाही. हिंसा केल्यामुळे कोणत्याच समस्येवर तोडगा निघत नाही, असे मोदी म्हणाले. तसेच यावर्षी तब्बल पद्म पुरस्कारासाठी ४६ हजार अर्ज आल्याचे मोदींनी सांगितले. खेलो इंडियानंतर सरकारनं खेलो इंडिया युनिर्व्हसिटी गेम्स खेळवणार असल्याचे मोदींनी सांगितले.
ओरिसातील कटक आणि भुवनेश्वर येथे ही क्रीडा स्पर्धा पार पडणार आहे. गेल्यावर्षी 29 डिंसेबरला मोदींनी मन की बातच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी देशातील युवकांवर भर दिला होता. युवकांना जातीवाद, अराजकता आणि अस्थिरतेची चीड आहे. आजचा युवक जातीपातींच्या पुढे जाऊन विचार करत आहे. त्यांना घराणेशाही आणि जातीवाद पसंत नसल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details