चंदिगड - लुधियानात सहायक पोलीस आयुक्त अनिल कोहली यांचे कोरोना विषाणू संसर्गामुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर लुधियानाच्या एसपीएस रुग्णालयात उपचार सुरू होते. जिल्हा जनसंपर्क कार्यालयाने ही माहिती दिली आहे.
पंजाबमध्ये सहायक पोलीस आयुक्तांचा कोरोनामुळे मृत्यू - लुधियाना के एसीपी अनिक कोहली का निधन
सहायक पोलीस आयुक्त कोहली यांच्या संपर्कात आलेल्या आणखी तीन अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे कार्यालयाने म्हटले आहे. सहायक पोलीस आयुक्तांनंतर आणखी तीन अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने पोलीस दलाला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी कोहली यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत कोहली यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला, तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.