लखनऊ- शहरात दोन महिलांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या घटनेत एक महिला गंभीर भाजली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसऱ्या महिलेला वाचवण्यात यश आले आहे. पोलिसांसमोरच ही घटना घडली.
उत्तर प्रदेशात दोन महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न; चौघांना अटक
लखनऊ शहरात दोन महिलांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. आत्मदहन करण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
शहराचे पोलीस आयुक्त सुजित पांडे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ही घटना संगनमताने घडवून आणली आहे. दोन्ही महिलांना इतर व्यक्तींनी आत्मदहन करण्यासाठी प्रोत्साहित केले. आम्ही चार व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एमआयएम जिल्हा अध्यक्ष कादिर खान आणि काँग्रेस नेते अनुप पटेल यांचा समावेश आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी एमआएम नेते कादीर खान यांच्या संपर्कात होता. दोन्ही महिलांना पेटवून घेण्यास त्याने प्रोत्साहन दिले. महिलांनी पेटवून घेताना माध्यम प्रतिनिधीही बोलवण्यात आले होते. एक जुने प्रकरण लवकर सोडविण्यासाठी महिलांना पेटूवन घेण्यास सांगण्यात आले होते, असे पोलिसांनी प्राथमिक तपासात सांगितले. दोन्ही महिला अमेठी येथील असून हे प्रकरण अमेठीला पाठविण्यात येणार आहे.