नवी दिल्ली -जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज देशाच्या लष्करप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला. आजपासून त्यांनी जनरल बिपिन रावत यांचे रिक्त झालेले पद भूषवले आहे. आतापर्यंत नरवणे लष्कर उपप्रमुखपदावर कार्यरत होते.
बिपिन रावत यांना भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) नियुक्त करण्यात आले आहे.
मऱ्हाठमोळे मनोज नरवणे लष्करप्रमुखपदी, आज स्वीकारला कार्यभार
जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज देशाच्या लष्करप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला. आजपासून त्यांनी जनरल बिपिन रावत यांचे रिक्त झालेले पद भूषवले आहे. तर, रावत यांना भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) नियुक्त करण्यात आले आहे.
मऱ्हाठमोळे मनोज नरवणे लष्करप्रमुखपदी
मनोज नरवणे मूळचे पुण्यामधील आहेत. नरवणे यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’ मध्ये झाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते जून १९८० मध्ये लष्करात दाखल झाले होते. त्यांचा परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने गौरव झाला आहे. आजवर अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.
Last Updated : Dec 31, 2019, 2:44 PM IST