लोकसभा २०१९: काँग्रेसची ८ वी यादी जाहीर, अशोक चव्हाण नांदेडमधून लढणार
एम वीराप्पा मोईली यांना कर्नाटकातील चिक्काबल्लापूर, हरिष रावत उत्तराखंड येथील नैनीताल-उधमसिंहनगर, मीनाक्षी नटराजन मध्यप्रदेशातील मंदसौर, राशिद अल्वी उत्तर प्रदेशातील अमरोहा आणि मनीष खांदूरी यांना उत्तराखंड येथील गढवाल येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
अशोक चव्हाण, मल्लिकार्जुन खरगे
नवी दिल्ली - काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी ३८ उमेदवारांची ८ वी यादी जाहीर केली आहे. यात कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील उमेदवारांचा समावेश आहे. मल्लिकार्जुन खरगे कर्नाटकातील गुलबर्गा, दिग्विजय सिंह मध्य प्रदेशातील भोपाळ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडमधून निवडणूक लढवतील.
याशिवाय, एम वीराप्पा मोईली यांना कर्नाटकातील चिक्काबल्लापूर, हरिष रावत उत्तराखंड येथील नैनीताल-उधमसिंहनगर, मीनाक्षी नटराजन मध्यप्रदेशातील मंदसौर, राशिद अल्वी उत्तर प्रदेशातील अमरोहा आणि मनीष खांदूरी यांना उत्तराखंड येथील गढवाल येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसने सिक्कीम विधानसभा निवडणुकांसाठी ३२ उमेदवारांची आणि अरुणाचल प्रदेशसाठी ५३ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.