नवी दिल्ली - भाजपने शुक्रवारी लोकसभा निवडणुकांठी ३६ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात आंध्र प्रदेश, आसाम, महाराष्ट्र, ओडिशातील उमेदवारांचा समावेश आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा ओडिशातील पुरीतून निवडणूक लढवणार आहेत.
लोकसभा २०१९: भाजपच्या ३६ उमेदवारांची यादी जाहीर, संबित पात्रा पुरीतून लढणार - puri
दिलीपकुमार किलारू आंध्रातील विजयवाडा येथून महाराष्ट्रात गिरीश बापट पुण्यातून, भारती पवार दिंडोरीतून आणि संबोर शुल्लाई मेघालयातील शिलाँग येथून लढणार असल्याचा निर्णय झाला आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर ही यादी जाहीर करण्यात आली.
दिलीपकुमार किलारू आंध्रातील विजयवाडा येथून महाराष्ट्रात गिरीश बापट पुण्यातून, भारती पवार दिंडोरीतून आणि संबोर शुल्लाई मेघालयातील शिलाँग येथून लढणार असल्याचा निर्णय झाला आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर ही यादी जाहीर करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी बैठकीत सहभाग घेतला.
बैठकीनंतर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी निर्णयाची माहिती दिली. 'या यादीत ओडिशातील भाजपचे अध्यक्ष बसंत पांडा, ज्येष्ठ नेते सुरेश पुजारी आणि राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांचा समावेश करण्यात आला आहे. आम्ही लवकरात लवकर पहिल्या आणि दुसऱ्याटप्प्यातील निवडणुकांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करणार आहोत,' असे ते म्हणाले.
लोकसभा २०१९ चा पहिला टप्पा ११ एप्रिलला होणार आहे. २३ मेला मतमोजणी होईल.