पाटणा - लोकसभा निवडणुकांसाठी बिहारमध्ये शुक्रवारी 'महागठबंधन'च्या उमेदवारांची घोषणा झाली. मागील खेपेस जेडीयूमधून लढणारे शरदा आयादव आता आरजेडीमधून माधेपुरा येथून लढणार आहेत. लालू प्रसाद यादव यांची मुलगी मिसा भारती यांना पाटलिपुत्रमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी २०१४ मध्ये या जागेवर भाजपच्या राम कृपाल यादव यांच्याशी झालेल्या लढतीत त्या हरल्या होत्या.
येथे पत्रकार परिषदेत राष्ट्रीय जनता दल नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. वरिष्ठ आरजेडी नेते रघुवंश प्रसाद सिंह वैशाली येथून लढतील. हिंदुस्थान अवाम मोर्चाचे नेते जितन राम मांझी यांना गया आणि विकासशील इन्सान पार्टीचे नेते आणि 'सन ऑफ मल्लाह' या नावाने प्रसिद्ध असलेले मुकेश साहनी यांना खगडिया येथून उमेदवारी दिली आहे.
मागील निवडणुकीत दरभंगा येथून जिंकलेले भाजप खासदार कीर्ती आझाद यांना या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. त्यांच्याऐवजी आरजेडीचे अब्दुल बारी सिद्दीकी हे दरभंगा येथून निवडणूक लढवतील.
राजेडीच्या खात्यात या जागा
नवादा, बांका, भागलपूर, माधेपूरा, दरभंगा, वैशाली, गोपालगंज, सीवान, महाराजगंज, सारण, हाजीपूर, बेगूसराय, पाटलिपुत्र, बक्सर, जहानाबाद, झंझारपूर, अररिया, सीतामढी, शिवहर
आरा येथील जागा सीपीआय (भाकप-एमएल) साठी सोडण्यात आली आहे.
आरजेडीचे उमेदवार
बांका- जयप्रकाश यादव
माधेपुरा- शरद यादव
दरभंगा- अब्दुल बारी सिद्दीकी
वैशाली- रघुवंश प्रसाद
गोपालगंज- सुरिंदर राम
भागलपूर- बुलो मंडल
महाराजगंज- रणधीर सिंह
सारण- चंद्रिका राय
हाजीपूर-श्रीचंद्र राव
बेगूसराय- तनवीर हसन
पाटलिपुत्र-मीसा भारती
जहानाबाद- सुरेंद्र यादव
नवादा- विभा देवी
झंझारपूर- गुलाब यादव
अररिया- सरफराज आलम
सीतामढी- अर्जुन राय
लोकसभा २०१९: शरद यादव माधेपुरातून तर, मिसा भारती पाटलिपुत्रमधून लढणार - misa bharti
पत्रकार परिषदेत राष्ट्रीय जनता दल नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. लालू प्रसाद यांची मुलगी मिसा भारती यांना पाटलिपुत्रमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी २०१४ मध्ये या जागेवर त्या हरल्या होत्या.
लोकसभा २०१९
आरएलएसपी - पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, उजियारपूर, बेतिया, जमुई
काँग्रेस - समस्तीपूर, मुंगेर, पटना साहिब, सासाराम, वाल्मीकी नगर, सुपौल, किशनगंज, कटिहार, पूर्णिया
हम - नालंदा, गया, औरंगाबाद
व्हीआयपी - खगडिया, मुजफ्फरपूर, मधुबनी