महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्लीत हाडं गोठवणारी थंडी..! तापमान २.४ डिग्रीपर्यंत घसरले, मोडला १०० वर्षाचा रेकॉर्ड

राजधानी दिल्लीमध्ये सकाळी ६.१० वाजता तापमानाचा पारा २.४ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे.

Low temperature in delhi
दिल्लीतील थंडी

By

Published : Dec 28, 2019, 8:18 AM IST

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये सकाळी ६.१० वाजता तापमानाचा पारा २.४ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. या हिवाळ्यात दिल्लीच्या थंडीने १०० वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे.

आज सकाळी दिल्लीतील किमान तापमान २.४ डिग्रीपर्यंत खाली आल्याची माहिती हवामान विभागाने दिली. हाडे गोठवून टाकणाऱया थंडीमुळे बेघर नागरिकांनी 'शेल्टर होम' म्हणजे आश्रय गृहांचा सहारा घेतला आहे. गरम कपड्यांशिवाय थंडीचा सामना करणे अवघड झाले आहे. काहीजण शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करत आहेत. तापमान घसरल्यामुळे राजपथ मार्गावर दाट धुके पसरले आहे. याबरोबरच शहरातील अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details